मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०११

-------------------------------------------------------------------
वाघाचे पंजे----१९
भिकार्‍यांचा राजा---बेगर किंग
जंगलात अचानक वाघाचे पंजे दिसावे व वाघ जवळच असावा, हे जसे ठशांवरून कळते तसे काही वेळा कोण काय बोलते त्यावरून खरा अंदाज निघतो !
राहूलने महाराष्ट्रात फिरताना एके ठिकाणी गाडीच्या काचा खाली करून रस्त्यावरच्या भिकार्‍याला विचारले की तू कुठून आला आहेस ? तर त्याने सांगितले की यूपी मधून. म्हणजे तुम्ही युपीमधले लोक महाराष्ट्रात भीक मागायला जाता, हे खरेच आहे. ती वस्तुस्थिती आहेच. उगाच राहूलच्या नावाने आरडाओरड का करता ?
असेच त्याने दिल्लीत एका सिग्नलला गाडी उभी असताना शेजारच्या मर्सीडीज वाल्याला विचारले होते की तुम्ही कुठून आलात ? तर त्याने सांगितले की इटलीतून. म्हणजे इटालियन लोक भारतात येऊन श्रीमंत होतात, हे ही तितकेच खरे असावे !
लोकसभेत सोनिया गांधी, कृषिमंत्री शरद पवारांच्या डावीकडे बसतात. तसेच त्यांच्या डावीकडे वित्तमंत्री प्रणब मुखर्जी बसतात. एकदा शरद पवारांना विचारण्यात आले की नेमक्या डावीकडेच तुमच्या तोंडात कॅंसर कसा झाला ? तर त्यांनी डावीकडे पाहिले. तर त्यांना दिसल्या सोनियाजी. प्रणब मुखर्जींना विचारण्यात आले की तुमची अर्थव्यवस्था इतकी उजवी आहे, ठणठणीत आहे, तर आताच तिला कॅंसरसारखी घरघर का लागली ? तर त्यांनी उजवीकडे पाहिले. तर त्यांना दिसल्या सोनियाजी. ह्यावरून राहूलला कळले की कॅंसरमध्ये डावे-उजवे असत नाही !
इटली मध्ये खूप वर्षांपूर्वी एका समाजात अशी पद्धत होती की मेलेल्या व्यक्तीला ज्या शवपेटीत ठेवीत त्याच्या भोवती त्या व्यक्तीच्या आवडत्या खाण्याच्या वस्तू ठेवीत. तिथेच दुसर्‍या एका समाजात अशी पद्धत होती की मेलेल्या व्यक्तीला ज्या शवपेटीत ठेवीत त्याच्या भोवती एक खतरनाक विषारी साप ठेवीत. एका पर्यटकाने गाईडला विचारले की अशा वेगवेगळ्या पद्धती का होत्या ? गाईड सांगू लागला की त्यावेळी एक माणूस मरण पावला होता. रीतसर त्याला शवपेटीत ठेवण्यात आले होते. पण त्याच्या नातेवाईकांनी अर्ज केला की सकाळीच तर ते चांगले हसतखेळत होते. ते मेलेले नसतीलच. राजाच्या आदेशावरून थडगे उकरण्यात आले, शवपेटी उघडण्यात आली, तर काय खरेच तो माणूस जिवंत होता. ह्यावरून राहूल राजाने फतवा काढला की ज्या माणसाला पुराल, तो मेलेलाच असला पाहिजे. एका समाजाने ह्यावर विचार केला की समजा तो जिवंत असेल तर त्याला आसपास काही खाण्यासाठी ठेवावे, म्हणजे तो जगेल तरी. दुसर्‍या समाजाने विचार केला की उगाच आपल्यावर शेकायला नको. शवपेटीत एक विषारी साप ठेवू या. माणूस जिवंत असेल तर साप त्याला चावेल व राजाची आज्ञा पाळल्या जाईल. तर, ह्या गोष्टी बरहुकूम राहूलने ६ हजार कोटी रुपये युपीच्या विणकरांना कर्जाऊ आणले आहेत. आता ते इतरांकडून भीक मागणार नाहीत. भीक मागायला महाराष्ट्रात जाणार नाहीत. ह्यावर मायावती म्हणतात, आता आमच्या लोकांना महाराष्ट्रात भीक मागायला जावेच लागणार नाही. त्यांच्या सोयीसाठी आम्ही युपीचेच चार भाग करतो आहोत. त्यांना आता जवळच भीक मागता येईल !

-------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

----------------------------------------------
Rahul ----The Beggar King !
Don't you doubt that UPwallas are beggars. As Rahul says, once he asked a beggar in Maharashtra, "Where are you from ?" and he said UP. That proved that people from UP go to Maharashtra to beg. ( Period ! )
Similarly once Rahul asked the man in the neighbouring Mercedeze car, "Where are you from ?" And he answered, "From Italy". Doesn't this prove that people from Italy become rich, once they come to India ?
Since both times he is right, let us concede to Rahul that he wins, hands down ! ( Symbol "hand" not down ! )
Similar is the inference from our Parliament. If you have observed, Soniaji sits next to Agriculture Minister, Shri.Sharad Pawar. Pawar sits left to her, and Finance Minister PranabMukherjee sits to her right. Once Pawar was asked, why did you have cancer in your left cheek ? Before answering he looked left and there was Soniaji. When Finance Minister had said that Indian economy is healthy, he was asked, how come, it has become so sick, so quickly ? Before answering he looked to right and there was Soniaji. When this was narrated to Rahul, he rightly concluded that one should ne agressive and give cancer to right , left and center !!!
Tourists going to Italy tell this story. This ,story highlights, how you should give an order . The story goes like this: In Italy there is a custom in one class of society to bury a dead man in a coffin and keep eatables in the coffin. There is another class in the Italian society which similarly burries people in the coffin but they keep a deadly pisonous snake in the coffin. The Tourist asks the guide, as to why such different customs ? The guide explains that it is because the right question was not asked by the King. How so ? Guide narrates that once a man died and was burried in the coffin, as per custom prevailing then. The dead man's relatives appealed to the King that it must be a mistake. The said man was very much alive in the morning and could be still living and not dead. King ordered to reopen the coffin and to everybody's surprise the dead man was really alive, though very weak. The king Rahul then ordered that henceforth, only dead persons should be burried. One class of society thought that by mistake, if the person is alive then let us keep some eatables in the coffin so that he may survive. The other class of society ( Rahul's party perhaps ) thought that to make sure the man is really dead , let us keep a poisonous snake in the coffin, so that when re-opened he would definitely be dead. Taking cue from the story, Rahul has brought a Cenral Govt; scheme of six thousand crores rupees, by which he will give loans to the weavers in UP. Now, he is sure the UPwallas will not have to go to Maharashtra for begging. Similarly for the same cause, Mayawati has proposed splitting UP in four smaller states, so that UPwallas don't have to go all the way to Maharashtra for begging. Now they can beg, near, in UP itself ! One order and two ways of customs !!

------------------------------------------------------
Arun Anant Bhalerao

-------------------------------------------------------------------------------------------------

रविवार, १३ नोव्हेंबर, २०११

-------------------------------------------------------------------------------

वाघाचे पंजे----१८

मधुमेह अधिक बालदिन

लग्नसंमारंभाच्या वेळेस जेव्हा लगबग असते व गाड्या व माणसे यांची योजना करतात तेव्हा हमखास लहान पोरांना काय, कुठल्याही गाडीत कोंबतात. पूर्वी जसे म्हणत गाड्याबरोबर नळाची यात्रा. ( बैल गाड्यांच्या ऍक्सल वर चाक फिरायचे त्याला वंगण, एक प्रकारचे ऑइल, लावण्यासाठी ते एका नळकांड्यात ठेवून ते गाडीला अडकवीत व अशी नळाला गाडीबरोबर यात्रा घडे ! ). असेच ह्यावर्षीच्या बालदिनाचे झाले असावे. पूर्वी कसा बालदिन एकटा स्वतंत्र येई. मग त्याचे लाडही स्वतंत्र व खास होत असत. पण ह्या वर्षी मधुमेह-दिन व बालदिन एकत्रच आले आहेत. हे म्हणजे कोणी तरी लहान मूल समजून बालदिनाला मधुमेह-दिनाबरोबर ढकलले असावे. बालदिन काय तर फुगे, फुले, चॉकलेट, वगैरे. ते आता मधुमेह-दिनाबरोबर करूयात की !
चाचा नेहरूंचा हा खरे तर वाढदिवस. १४ नोव्हेंबर. पण त्यांना मुले आवडत म्हणून बालदिन करायची प्रथा सुरू झाली. चाचा नेहरूंना मुले खरेच आवडत हे मात्र नक्की. कारण मी तिसरीत असताना हे प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यावेळी मी हैद्राबादी होतो. माझी आई आजारी होती. तिला डॉ.मेलकोटे ह्यांच्या सॅनेटोरियम मध्ये ठेवलेले होते. हे डॉ.मेलकोटे हैद्राबादचे आरोग्यमंत्री होते व नेहरूंसारखेच लाल-बुंद गोरे होते. त्यांच्या सॅनेटोरियमला चाचा नेहरू भेट देणार होते. हे मला हॉस्पिटलच्या नर्सेस, दायांकडून कळले आणि मी लागलीच तिथल्याच एका गुलाबाच्या झाडावरचे टपोरे गुलाबाचे फूल तोडले व सगळेजण जिथे नेहरूंची वाट पहात होते तिथे उभा राहिलो. नेहरू आले व एकच लगबग झाली. मोठी माणसे अंदाजाने लगेच पुढे झाली. मी दिसेनासाच झालो होतो. मला वाटले आता कसले दिसतात आपल्याला चाचा नेहरू व आपण त्यांना कसे देणार गुलाबाचे फूल ? पण ह्या गर्दीला मध्येच चिरीत चाचा नेहरूच माझ्याजवळ आले, थोडे वाकले व मला फूल द्यायचे सुचायच्या आत स्वत:च त्यांनी ते फूल स्वीकारले. एका क्षणाचाच प्रसंग. पण आज साठ वर्षे तो माझ्या स्मरणात लख्ख स्पष्ट दिसतो. त्या माणसाचे लहान मुलांचे प्रेम खरेच मोठे प्रांजळ व निर्मळ होते.
असल्या चाचा नेहरूंचा वाढदिवस मधुमेह-दिनाच्या दिवशी यावा ह्यात काही तरी अनामिक संकेत असावा. मधुमेह म्हणतात की अनुवंशिक असतो. आपल्या आईवडिलांपैकी कोणाला तो असला तर आपल्यालाही तो होऊ शकतो. माझ्या आईला मधुमेह होता. म्हणून की काय दोन वर्षांपूर्वी मलाही तो झाला. मधुमेहात आपण जे अन्न खातो त्यातली उर्जा घेण्यात येताना ज्या साखरेचे उर्जेत रूपांतर व्हायला हवे ते पूर्ण प्रमाणात न होता ज्यास्तीची साखर आपल्या शरीरात, रक्तात तशीच साठून राहते. मग त्याचा दुष्परिणाम होतो. तर अशा मधुमेहाचे व चाचा नेहरूंचे काय संबंध असावेत ?
भारताच्या जनतेने जवाहरलाल नेहरूंवर अतोनात प्रेम केले. त्यांना जवळ जवळ सगळे खूनच माफ केल्यासारखे, जनता त्यांच्यावर प्रेम करी. इतके की त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला विरोध केला तरी जनतेने त्यांना अपशब्द कधी दिले नाही. निदर्शने जरूर केली. त्यांना महाराष्ट्राचे वेगळे राज्य निर्माण करण्यास भाग पाडले पण त्यांचा दुस्वास नाही केला. असेच त्यांच्या राजनीतीचेही लोकांनी कौतुकच केले. हे कौतुक, लाड इतके झाले की जनतेलाच ह्या गोडपणाने जणु मधुमेहाचा त्रास व्हायला लागला. आजही नेहरूंच्या कित्येक गोष्टी जनतेला सतावीत असतात. पण मधुमेह देणार्‍या आईवडिलांना जसे आपण दूषण देत नाही तसेच नेहरूंना कोणी फारसे वावगे बोलत नाहीत व त्यांच्यावर आजच्या मधुमेहाचे खापर आपण फोडत नाही.
जंगलात जसा सगळीकडे हल्लकल्लोळ असला तरी श्वापदांच्या ठशांवरून लोकांना त्यांना ओळखावे लागते, त्यांचा सुगावा काढावा लागतो त्याच प्रमाणे राजकारणातल्या असंख्य मतभेदात काही अनामिक ठशांवरून आपापले अर्थ काढावे लागतात. जसे राजकारणातल्या अनेक वादावादीत नेहरूंचे स्मरण त्यांच्या लहान मुलांच्या निर्वाज प्रेमामुळे आजही आपल्याला सुखकारक वाटते.त्यांच्या असंख्य घोडचुकींमुळे देशाला झालेला मधुमेह त्यांच्या मुलांवरच्या प्रेमापोटी आपण सुसह्य समजतो.
म्हणजे ? म्हणजे ?.....वाघाचे पंजे ?

------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

-------------------------------------------------------------------

रविवार, १६ ऑक्टोबर, २०११

अण्णांच्या मौनाची भाषांतरे:
जंगलातले ठसे जसे श्वापदांची माहीती देतात, तसेच कधी कधी जंगलातली नीरव शांतताही खूपसे ऐकवून जाते. जसे अण्णांचे मौन खूप सांगून जाते. जसे:
परममित्र दिग्विजय :अण्णांचे मौन ही नक्कीच आरएसएस ची चाल आहे. एक दिवस अशा योजनेने आरएसएस संपूर्ण देशालाच चुप बसवेल.
(अण्णाजी का मौन, यह जरूर आरएसएस की चाल है । आरएसएस ऐसा ही पूरे देश को एक दिन चुप करायेगा ।)
मनमोहनसिंग : अण्णांचे मौन हे काही अवघड प्रकरण नाहीय. मी तर हे नेहमीच करत आलो आहे. राहूल काहीही सांगो, मी तर चुपच बसतो. ए.राजा, कलमाडी, मरन वगैरे मंत्री काहीही म्हणोत मी चुपच बसतो. त्यांनी माझ्यासमोर सर्व कर्तबगारी दाखविली पण मी काही बोललो का ?
(अण्णाजी का मौन इतनी क्या बडी बात है ? मै तो ये हरघडी रखता आरहा हूं । राहूल कुछ भी बोले, मै तो चुप ही रहता हूं । राजा, कलमाडी मेरे सामने सब कर्तब दिखा रहे थे, लेकिन मै कुछ बोला ?)
सोनिया : मला अजून हिंदी, इंग्रजी वगैरे भारतीय भाषा नीट अवगत नाहीत. म्हणून मग मी बघा कशी गपच बसते, सर्ववेळ !
(आय हॅव्ह स्टिल नॉट गॉट द हॅंग ऑफ हिंदी ऑर इंग्लिश, सो सी आय कीप क्वाएट ऑल द टाईम ।)
राहूल : अण्णांच्या मौनाला आम्ही फक्त उचलूनच नाही तर त्याला एक घटनात्मक दर्जा देऊ. पाहिजे तर घटनेत बदल करून आम्ही सर्वांना मौन धरायला लाऊ.
(अण्णाजी के मौन को हम घटनात्मक दर्जा देंगे । घटना मे बदल करके सभी को हम चुप करायेंगे ।)
लालकृष्ण अडवाणी : अण्णांचा हा मौनाचा मार्ग जर जनतेला भावत असेल तर माझी सातवी रथ-यात्रा ही मौन-रथ-यात्रा असेल. ती खूप काही सांगेल.
(जनचेतना रथ-यात्रा समाप्त होते ही हम अण्णाजीके बताये हुये रास्तेसे मौन-रथ-यात्रा निकालेंगे । वह बहुत कुछ कहेगी ।)
अरुण जेटली : मौन राखणे ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. चोरांना पकडल्यावर पोलीस कायदेशीर भाषेत सांगतातच की तुम्हाला काहीही न बोलण्याचा अधिकार आहे. तर मौन हे असे कायदेशीर आहे.
(मौन रखना यह एक कानूनी प्रक्रिया है । अंग्रेजी मे पोलीस चोर को पकडने के बाद कहते है की यू हॅव्ह राईट टु रिमेन सायलेंट । मौन ऐसा कानूनी है ।)
सुषमा स्वराज : मला ह्यात सरकारचे कारस्थान दिसते आहे. सरकार अशाप्रमाणे एक आवाज बंद करीत आहे.
(मुझे इसमे सरकारका षडयंत्र दिखता है । सरकार एक एक का ऐसा आवाज चुप करा रही है ।)
कपिल सिबल : मला टीम अण्णा म्हणते की मी नेहमी गोष्टींना वळणे देत राहतो. एकाच दिवशी १७ मुलाखतींचा विक्रम तर अण्णाच करतात. एका मुलाखतीत अण्णा म्हणाले होते की लोकपालाने भ्रष्टाचार नाही थांबला तर मी कपिल सिबल ह्यांच्या घरी पाणी भरीन. आता मी सिंटॅक्सच्या मोठ्या टाक्याच आणून ठेवतो. कदाचित ते त्या भरायला येतीलही.
(यह मुझे बताते थे के मै बात हमेशा घुमाता हूं । अब देखीये, अण्णा एक दिन मे १७ इंटरव्ह्यू देते थे और अब मौन रख रहे है । ऐसे बात फिराते फिराते वे तो चुपही हो गये है । अब मै सिंटॅक्सकी बडी टांकिया ले रहा हूं । शायद जल्दही अण्णा मेर घर पानी भरने आयेंगे, जैसा उन्होने कहा था, मौन के पहिले ।)
सलमान खुर्शीद : आम्ही आधी आमच्या सर्व नेत्यांचे मत घेऊ व मगच अण्णांच्या मौनावर बोलू.
(हम इस पर सबही नेताओंकी राय लेंगे और फिर अण्णाके मौन पर बोलेंगे ।)
बाळासाहेब ठाकरे : अरे गप काय बसताय. मनातल्या शिव्या कोणाला ऐकू येत नाहीत, हे आम्हाला ठाऊक आहे. म्हणून तर आम्ही अजूनही बोंबलोतय ना ?
( मौन क्या रखते हो ? मनमे दी हुई गालियां किसी को सुनाई नही देती यह मैने खुद जाना है ।)
अरविंद केजरीवाल : अण्णांच्या मौनाचा निर्णय आम्ही असाच घेतलेला नाही. अगोदर आम्ही ठिकठिकाणी ( जसे: चांदनी चौक, अमेठी, रायबरेली ) आम्ही जनमत चाचण्या घेतल्या. त्यात ९० टक्के लोकांनी मौन-व्रत घ्यावे असा कौल दिला व मगच आम्ही हे मौन-व्रत घेतले आहे.
(हमने अण्णा के मौन का निर्णय ऐसाही नही लिया. रायबरेली, और अमेठी मे इसके बारे मे हमने रेफरेंडम लिया था। उसमे लगभग ९० प्रतिशत लोगोंने अण्णा को चुप बैठने की सलाह दियी थी । उसके नतीजे हमने मौन व्रत चालू किया है ।)
किरण बेदी : मी आत्ताच माझ्या आयपॅडवर पाहिले तर अण्णा काही सांगत होते....पण मला आवाजच ऐकू येत नव्हता. मला वाटले माझ्या आयपॅडच्या ऑडिओतच काही तरी बिघाड आहे. पण आता कळले की हे मौन आहे. ह्याचा अर्थ माझा आयपॅड व्यवस्थितच आहे. बघा माझी बिनचूक व्यवस्था !
(मैने अभी अभी मेरे आयपॅड पे देखा की अण्णा कुछ कह रहे थे । लेकिन मुझे कुछ सुनाई नही दे रहा था । मुझे लगा की मेरे आयपॅड का ऑडिओ चल नही रहा होगा. अब मालूम हुआ की यह मौन है । इसका मतलब मेरा आयपॅड सही है ।)
प्रशांत भूषण : काश्मीर मध्ये हिंदू पंडितांचे तमाम-कामच सेपरेटिस्टांनी बंद केले. त्याला कायदेशीर दाखवण्याचे काम माझ्याकडे आले आहे. जर अण्णांचे मौन कायदेशीर असेल तर पंडितांचा आवाज बंद करवणे हेही कायदेशीरच म्हणावे लागेल. अहो, मला मारू नका !
(कश्मीर मे हिंदू पंडितोंका आवाज सेपरेटिस्ट लोगोंने कभी का बंद किया है । उसको कानूनन बताने का न्यौता मुझे मिला है । अगर अण्णा का मौन कानूनन हो सकता है तो हिंदू पंडितोंका आवाज बंद करवानाही कानूनन बनता है । मुझे मत मारो ।)
राजदीप सरदेसाई : अण्णा आपण आजवर अनेक मुलाखती दिल्या आहेत. त्या सर्व आम्ही एक्स्लुझिव्हली कव्हर केलेल्या आहेत. तर, ह्या वेळेसही मौनाचे कव्हरेजही आम्हीच करणार आहोत. मौनावर आम्हाला थोड्या साउंड-बाईटस्‌ द्याव्यात. भले लिहून दिल्या तरी चालेल.
(अण्णाजी आपने हमे अबतक बहुत मुलाखतें दी है । इस बार मौन का कव्हरेजभी हमही एक्स्लूझिव्ह करेंगे । हमे इसपे थोडी साउंड-बाइट दीजे । भले लिखके ही सही ।)
राहूल कंवल : अण्णा मौन ठेवतात तेव्हा सगळा देश बोलत असतो. हाच आमच्या सेंटर-स्टेजचा विषय आहे. ह्यात आमचा एक फायदा असा की जर कोणी माईक आणायचा विसरला तरी मौनामुळे ते धकणारे आहे.
(अण्णाजी मौन रखते है तो देश बोल उठता है । यही हमारे सेंटर-स्टेज का विषय होगा । एक अच्छी बात इसमे ऐसी है के अगर हम माइक लाना भूलभी गये तो मौन तो कव्हर करही सकते है ।)
अरनब गोस्वामी : अणाजी आपण मौनात जे सांगाल ते देशाला कसे ऐकू येईल ?
(अण्णाजी, मौन मे आप जो बोलेंगे वो लोगोंको कैसे सुनाई देगा ?)
बरखा दत्त : अण्णाजी, हे मौन राखणे आपण भारतीय स्त्री कडून शिकला आहात का ? ह्या मौनाने आपण काय सांगू पाहता आहात ?
(अण्णाजी क्या चुप रहना आपने भारतीय नारीसे सीखा है ? इस चुप रहनेसे आप क्या बोलना चाहते है ?)
निखिल वागळे : अण्णा, आत्ताच कपिल सिबल म्हणाले आहेत की हे मौन नसून आम्ही त्यांची बोलती बंद केली आहे, ह्यावर तुम्ही काय म्हणाल ? तुम्हालाही असे वाटते का ? बघा, पडद्यावर, ८० टक्के लोक होय म्हणताहेत. आणि फक्त २० टक्केच लोक मौन पाळताहेत.
( अण्णाजी, अभी अभी कपिल सिबल बता रहे थे की यह अण्णा का मौन नही, हमने उनकी बोलती बंद की है । इसपर आपका क्या कहना है ? आप क्या समझते है ? स्क्रीन पे देखीये, ८० प्रतिशत जनता "हां" कह रही है और २० प्रतिशत मौन लेकर बैठी है । )

----------------------------------------------------------------------

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०११

-----------------------------------------------------------------------------------------------------------

वाघाचे पंजे---१७
धाक-दपटशा !
प्रशांत भूषण ह्यांच्यावर, कॅमेर्‍यासमोर, तीन तरुणांनी मारहाण केली आणि एक मूलभूत सत्य सर्वांसमोर नागडे झाले. कितीही संस्कार संस्कार म्हटले तरी धाक-दपटशा हाच आपला मूळ स्वभाव झाला आहे.
लहानपणी वडिलांचा धाक इतका असतो की त्यापायी मुले त्यांच्याशी शक्यतो कमीच बोलतात. आई हट्ट केला की बाथरूम मध्ये कोंडून घालते म्हणून लहान मुले कोवळ्या वयातच धूर्त होऊ लागतात. शाळेत मास्तर त्यांच्या छडीचा प्रसाद देतात म्हणून अभ्यास करावा लागतो. तरुण पणात शाळा-कॉलेजात जरा दादागिरी नाही केली तर मग ते तारुण्य काय कामाचे ? राजकारणात तर ज्याचा धाक त्याचेच राज्य ! खरे तर सोनिया गांधी आजारी होत्या, भारताबाहेर ऑपरेशनसाठी गेल्या होत्या, तेव्हा सत्तापिपासूंना बंडखोरी काही अवघड नव्हती. पण उगाच रिस्क नको बुवा, कलमाडी बघा ना, बसलेत आत तिहार जेलात, इतके जवळचे असूनही. हा धाक कसा मतलबी लोकांना सरळ सुतासारखा ठेवतो. साधे पोलीसांचेच बघा. भारतात ( २००६ सालच्या सरकारी आकड्यांप्रमाणे ) दर एक लाख लोकांमागे पोलीस आहेत केवळ १४३. आता एक लाख लोक शिवाजी पार्कावर जमले तर केवढा मोठा समूदाय होतो ते आठवा. एवढ्या लोकांनी ठरवले तर १४३ पोलीसांना ते सहजी पळता भुई कमी करून सोडतील. पण त्यांचा धाक असा असतो की एवढेच पोलीस एक लाख लोकांना आवरू शकतात. सिग्नलवर मी सिग्नलच्या आधी कोणी पोलीस आडोशाला आहे का हे पाहतो व नसेल तर बेधडक सिग्नल तोडतो. पोलीस असेल तर मात्र निमूटपणे उभा राहतो. धाकाचे केव्हढे हे सिग्नल !
प्रत्येक वयस्कर माणसाला विचारा, त्याने त्याच्या आयुष्यात केव्हाना केव्हा तरी मार खाल्लेला असतो व मार दिलेलाही असतो. मागे राजीव गांधीच्या काळात प्रणब मुखर्जींना असेच एकदा त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी बदडून काढले होते. नवे सरकार स्थापन होण्याच्या काळात सर्वच पक्ष आपापल्या सभासदांना पंचतारांकित हॉटेलात कोंडूनच ठेवतात. अशी तर आपली लोकशाही ! बाळासाहेबांचा दराराच अजून लोकांना शिवाजी पार्कावर भाषणाला ओढून आणतो. "स्टेट ऑफ फियर" नावाच्या मायकेल क्रिश्टनच्या कादंबरीत तर लोकांच्या भीतीपोटी सरकारे राज्य कशी करतात हेच खुबीने दाखवले आहे. माणसाच्या सगळ्या व्यवहारात भयाचे असे साम्राज्यच स्थापन झालेले असते. हाच आपल्यावरचा धाक-दपटशा !
गांधींची अहिंसा किंवा सध्या अण्णांची अहिंसा चालते आहे तीही तिच्या धाकामुळेच. उपोषण करतो म्हटले की सरकार घाबरते, ते लाखो लोक एकत्र येतील, बोंबाबोंब करतील ह्या धाकानेच सरकार नमते आहे. अहिंसाही कधी कधी हिंसा करते ती अशी ! काश्मीरचा प्रश्न त्यांनी अजून लोंबकळता ठेवलाय तो अशाच हिंसक धोरणांनी व आपणही तेव्हढ्याच हिंसेच्या प्रत्युत्तराने. काश्मीरातून पंडितांना हकलून देण्यात आले होते ते धाकानेच व आजही त्यांच्यावर थोडाफार धाक आहे तो लष्कराचाच ! धाक-दपटशा असा आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे !
जंगलात एक बरे असते. इथला कायदाच मुळी, बळी तो कान पिळी. त्यामुळे इथे ठशावरून सिंहाचा ठाव घेताना त्याच्या धाकाचाच आपण अंदाज घेत असतो. आपल्या स्वभावातले धाक-दपटशाचे हे ठसे मात्र आपण आपलेच पाहून खात्री करायला हवी ! म्हणजे ? म्हणजे, वाघाचे पंजे !
-------------------------------------------------------------------------------

सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

-------------------------------------------------------------------------------------------------
वाघाचे पंजे--१७
कोण आत्ता कुठे---कसा ?
जंगलात तर्क लढवायला श्वापदे प्रत्यक्ष समोर नसतात. तेव्हा त्यांच्या ठशांवरून, त्यांच्या झाडांना शिंगे घासण्यावरून, व त्यांच्या हगण्यावरून, शेणावरून अनुमान काढण्याची पद्धत आहे. राजकारण हे सुद्धा एक निबिड अरण्यच असल्यासारखे असते. येथे जे दिसते त्यामागे श्वापदांचे अनेक व्यवहार छुपलेले असतात. त्यांच्या मागावर त्यांनी करून ठेवलेली घाण दुर्गंधी आणतेच. आता ह्या एका बातमीतच पहा, काय काय लपलेले दिसते ते:
"मल्लिका साराभाई ह्यांनी २००२ मध्ये सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल केली होती. २००२ साली गुजरातेत जी जातीय दंगल उसळली त्यासंबंधी. आत्ता काल त्यांनी एक आरोप केला की मोदींच्या लोकांनी माझ्या वकीलांना त्यावेळी १० लाख रुपये लाच देऊ केली होती. त्यांचे सध्याचे वकील महेश अगरवाला ह्यांनी ह्या आरोपाचे खंडन केले. ते म्हणाले की मी त्यावेळी (२००२) साराभाईंचा वकील नव्हतो व मला काही कोणी लाच दिलेली नाही.
कोण होते मल्लिका साराभाईंचे त्याकाळचे वकील ? तर ते होते पी. चिदंबरम. बरोबर आज जे गृहमंत्री आहेत व जे पूर्वी अर्थमंत्री होते तेच ते चिदंबरम. ( म्हणजे ही याचिका एकप्रकारे कॉंग्रेसनेच केलेली होती हे किती स्पष्ट आहे ! ).
त्यावेळी ह्या याचिकेची सुनावणी करणारे न्यायाधीश कोण होते ? तर ते होते श्री.शिवराज पाटील. बरोब्बर ! हेच ते सध्याच्या वादात अडकलेले कर्नाटकाचे लोकायुक्त असलेले ( व आरोपांनी विद्ध होऊन आजच राजीनामा देणारे ) शिवराज पाटील. ह्यांनीच अवघ्या सहा महिन्यापूर्वी कपिल सिबल ह्यांच्या अखत्यारीत २-जी प्रकरणात एक-सदस्य-चौकशी मंडळ बनून एक अहवाल दिला होता ज्याप्रमाणे मग कपिल सिबल पूर्वीच्या भाजपच्या मंत्र्यांनाही ह्या प्रकरणात गोवूं शकले.
ह्याच शिवराज पाटीलांबरोबर मल्लिका साराभाईंची याचिका ऐकणार्‍या दुसर्‍या न्यायाधीश त्याकाळी होत्या जस्टिस सीमा. कोण ह्या ? अहो, सध्या त्या उत्तर प्रदेश सरकारच्या मानव-अधिकार मंडळाच्या अध्यक्षा आहेत.
गुजरात सरकारची बाजू लढवणारे त्यावेळी वकील होते एक तुषार मेहता नावाचे वकील. कोण हो हे ? तर तेच हे सध्याच्या गुजरात सरकारचे ऍडिशनल ऍडव्होकेट जनरल."
ह्या बातमीतून कोणी कोणाला लाच दिली हे जरी समजत नसले तरी कोणाला कशामुळे काय काय मिळाले ते मात्र हमखास दिसते. जसे अशा याचिका लढविल्याबद्दल कॉंग्रेस तर्फे पी.चिदंबरम ह्यांना अर्थमंत्रीपद व गृहमंत्रीपद, तर न्यायाधीशांना निवृत्तीनंतर मानाची व लठ्ठ पगाराची पदे ! आहे ना जंगलातले ठसे पाहूनचे अचूक अंदाज !....म्हणजे, म्हणजे.....वाघाचे पंजे !

-----------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

-----------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------
वाघाचे पंजे--१७
कोण आत्ता कुठे---कसा ?
जंगलात तर्क लढवायला श्वापदे प्रत्यक्ष समोर नसतात. तेव्हा त्यांच्या ठशांवरून, त्यांच्या झाडांना शिंगे घासण्यावरून, व त्यांच्या हगण्यावरून, शेणावरून अनुमान काढण्याची पद्धत आहे. राजकारण हे सुद्धा एक निबिड अरण्यच असल्यासारखे असते. येथे जे दिसते त्यामागे श्वापदांचे अनेक व्यवहार छुपलेले असतात. त्यांच्या मागावर त्यांनी करून ठेवलेली घाण दुर्गंधी आणतेच. आता ह्या एका बातमीतच पहा, काय काय लपलेले दिसते ते:
"मल्लिका साराभाई ह्यांनी २००२ मध्ये सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल केली होती. २००२ साली गुजरातेत जी जातीय दंगल उसळली त्यासंबंधी. आत्ता काल त्यांनी एक आरोप केला की मोदींच्या लोकांनी माझ्या वकीलांना त्यावेळी १० लाख रुपये लाच देऊ केली होती. त्यांचे सध्याचे वकील महेश अगरवाला ह्यांनी ह्या आरोपाचे खंडन केले. ते म्हणाले की मी त्यावेळी (२००२) साराभाईंचा वकील नव्हतो व मला काही कोणी लाच दिलेली नाही.
कोण होते मल्लिका साराभाईंचे त्याकाळचे वकील ? तर ते होते पी. चिदंबरम. बरोबर आज जे गृहमंत्री आहेत व जे पूर्वी अर्थमंत्री होते तेच ते चिदंबरम. ( म्हणजे ही याचिका एकप्रकारे कॉंग्रेसनेच केलेली होती हे किती स्पष्ट आहे ! ).
त्यावेळी ह्या याचिकेची सुनावणी करणारे न्यायाधीश कोण होते ? तर ते होते श्री.शिवराज पाटील. बरोब्बर ! हेच ते सध्याच्या वादात अडकलेले कर्नाटकाचे लोकायुक्त असलेले ( व आरोपांनी विद्ध होऊन आजच राजीनामा देणारे ) शिवराज पाटील. ह्यांनीच अवघ्या सहा महिन्यापूर्वी कपिल सिबल ह्यांच्या अखत्यारीत २-जी प्रकरणात एक-सदस्य-चौकशी मंडळ बनून एक अहवाल दिला होता ज्याप्रमाणे मग कपिल सिबल पूर्वीच्या भाजपच्या मंत्र्यांनाही ह्या प्रकरणात गोवूं शकले.
ह्याच शिवराज पाटीलांबरोबर मल्लिका साराभाईंची याचिका ऐकणार्‍या दुसर्‍या न्यायाधीश त्याकाळी होत्या जस्टिस सीमा. कोण ह्या ? अहो, सध्या त्या उत्तर प्रदेश सरकारच्या मानव-अधिकार मंडळाच्या अध्यक्षा आहेत.
गुजरात सरकारची बाजू लढवणारे त्यावेळी वकील होते एक तुषार मेहता नावाचे वकील. कोण हो हे ? तर तेच हे सध्याच्या गुजरात सरकारचे ऍडिशनल ऍडव्होकेट जनरल."
ह्या बातमीतून कोणी कोणाला लाच दिली हे जरी समजत नसले तरी कोणाला कशामुळे काय काय मिळाले ते मात्र हमखास दिसते. जसे अशा याचिका लढविल्याबद्दल कॉंग्रेस तर्फे पी.चिदंबरम ह्यांना अर्थमंत्रीपद व गृहमंत्रीपद, तर न्यायाधीशांना निवृत्तीनंतर मानाची व लठ्ठ पगाराची पदे ! आहे ना जंगलातले ठसे पाहूनचे अचूक अंदाज !....म्हणजे, म्हणजे.....वाघाचे पंजे !

-----------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

-----------------------------------------------------------------------------------------------------------

बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

-------------------------------------------------------------------------------------------------
वाघाचे पंजे : १६:
क्रिएटिनिनची क्रियेटिव्हिटी !
रक्ताच्या तपासणीत क्रियेटिनिन नावाचे घटक तपासतात व ते साधारणपणे ०.९ इतके असावे लागते तर तब्येत आलबेल आहे असे समजतात. बहुतेक सीरीयस पेशंटना हॉस्पिटल मध्ये असताना ह्या क्रियेटिनिनच्या भोज्याला कधी ना कधी शिवावेच लागते, इतके हे प्रकरण सर्वव्यापी आहे. हॉस्पिटल मध्ये १५/२० दिवस काढल्यावर माझे एकदा क्रियेटिनिन ३.२ वर पोचले होते. झाले, डॉक्टरांनी नेहमीच्या धोक्याच्या घंटया वाजवल्या. नेफ्रॉलॉजिस्ट ( किडनी स्पेशॅलिस्ट ) कडे जावे लागले. त्याने परत निरनिराळ्या सॉल्टस्‌चे संतुलन बघण्याच्या तपासण्या केल्या, औषधे दिली आणि खाजगीत सांगितले की घाबरू नका, फक्त भरपूर पाणी प्या ! पाच दिवसांनी परत क्रियेटिनिन तपासले. ते काही हटत नव्हते. मग डॉक्टर म्हणायला लागला ह्यावर एक इंपोर्टेड औषध आहे, जे सलाईनमधून द्यावे लागेल व ते जरा महागडे आहे, ४ हजार रुपयाची एक बाटली व अशा चारपाच तरी घ्याव्या लागतील. ह्याच डॉक्टरचे खाली औषधांचे दुकान होते. दुकानदार स्वत: म्हणाला की कमाल आहे, क्रियेटिनिन काही औषधाने लगेच खाली येणारे प्रकरण नाहीय. त्याला महिना दोन महिने लागतातच. मग ह्यावर खात्री करण्यासाठी ज्या पॅथॉलॉजी लॅब मध्ये क्रियेटिनिन तपासतात त्या टेक्निशियनलाच विचारले की बाबा हे किती सीरीयस आहे? मरणार तर नाही ना ? त्याने सांगितले की साहेब तुम्ही एकच किडनी असलेले लोक पाहिले आहेत का ? त्यांचे क्रियेटिनिन एक किडनी निकामी झालेली असल्याने ( ती नसल्यानेच ) ८ पर्यंत जाते. काही होत नाही. एका सरकारी इस्पितळातल्या स्पेशॅलिस्टाला विचारले तर तो म्हणाला, आम्ही तर क्रियेटिनिन तपासतच नाही. काय उपयोग ? ज्यास्त असले तरी काय उपयोग, काही औषधे आहेत का ? त्यापेक्षा पायावर सूज आहे का तेवढे पहावे व होईल कमी म्हणून धकवावे.
मग डॉक्टर लोक हमखास नेहमी क्रियेटिनिनचे प्रकरण का उकरून काढतात ? कारण हॉटेल सारखेच त्यांच्या प्रॅक्टीस मध्ये किती खाटा गेलेल्या आहेत त्यावर नफा अवलंबून असतो. मुळात डॉक्टरची प्रक्टीसच लोक आजारी पडण्यावर अवलंबून असते. मग त्यांना हे क्रियेटिनिन प्रकरण चांगले मदत करते. पेशंटला घाबरवता व धरून ठेवता तर येते, पाहिजे तितका वेळ, शिवाय पेशंट मरण्याचा धोकाही नसतो. कोणाही महिना दोन महिने इस्पितळात काढलेल्या पेशंटला विचारा, त्याला हे क्रियेटिनिन प्रकरण पाठ असते !
हे क्रियेटिनिन प्रकरण अमरसिंगांच्या डॉक्टरांनी काढले नसते तर नवलच ! त्यांचे क्रियेटिनिन वाढले म्हणे ! किती ? तर ०.९ चे झाले १.३ ! आणि त्यासाठी हॉस्पिटलात दाखल करणे अत्यावश्यक असे ठरले ! ते घरी असताना त्यांचे क्रियेटिनिन वाढले असते तर काय केले असते ? तर काही नाही, जरा पाणी ज्यास्त प्यायचे झाले ! मग हा सगळा तमाशा कशा करिता ? तर तिहार जेल नको, हॉस्पिटल परवडले म्हणून. तशात सायकियॅट्रिस्टिक मदत कशासाठी हवी तर ऍंक्झाइटीसाठी. काय असते ही मदत ? औषधे असतील तर ती तिहार जेलमध्येही घेता येतील की, आणि समुपदेशनाने जात असेल तर मग ऍंक्झायटी ती काय ?
जंगलातले वाघाचे ठसे जर तो पाण्यापाशी दबा धरून बसला आहे असे दाखवत असतील तर आपण काय समजतो ? की पाण्यासाठी आलेल्या प्राण्यांची शिकार करण्याचा त्याचा मनसुबा असावा ! तसाच अमर सिंगाचा काय मनसुबा असावा, हे कळायला तर ठसेही पाह्यची गरज लागू नये ! शिवाय त्यांचे वकील कोण तर, राम जेठमलानी ! हरे राम !

---------------------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११

सीसीटीव्ही--व्हीटीसीसी !
दिल्लीच्या नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटादरम्यानच्या गदारोळात सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे खूपच वादंग झाले. अवघ्या दहा हजार रुपयाच्या ह्या कॅमेर्‍याचे एवढे काय कौतुक ? असे कॅमेरे मुंबईच्या जव्हेरी बाजारातल्या स्फोटादरम्यानही तर होतेच की, तरीही त्यातून काही सापडले का ? का मग ह्या सीसीटीव्हीचे एवढे महत्व ?
सीसीटीव्ही हा कॅमेरा नसून ही एक वृत्ती आहे. तो एक संदेश आहे. तुम्ही कायम नजरेच्या टप्प्यात आहात असे तुमच्यावर ठासवणारे हे तत्व आहे. ह्याच तत्वानुसार आधुनिक जगात नियंत्रण ठेवणे सुलभ झाले आहे. समजा तुम्ही चोर आहात व एका जवाहिर्‍याच्या दुकानात चोरी करायला गेला आहात. आणि तिथे तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा कोपर्‍यात लावलेला पाहिला, तर तो नादुरुस्तही असेल असे तुम्ही समजत नाही. तर त्यात आपण न दिसता कशी चोरी करता येईल किंवा त्या कॅमेर्‍याला निकामी करून कसा कार्यभाग साधता येईल, असाच सराईत चोर विचार करील. म्हणजे एक क्षुल्लक कॅमेरा, जो कदाचित नादुरुस्तही असू शकतो, कित्येक पोलिसांचे काम करून जातो. अमेरिकेतल्या घरांसमोर नुसताच सीसीटीव्ही कॅमेरा नाही तर तो पुरवणार्‍या सुरक्षा कंपनीची पाटीही लावलेली असते. ती अर्थातच चोरावर धाक दाखवण्यासाठी असते. कित्येक वेळा ते डमी कॅमेरेच निघतात.
पूर्वी एक म्हण असायची की जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसर्‍यांच्या काचेच्या घरावर दगडं मारू नयेत. ह्यामागे आपल्याही काचेच्या घरावर इतरांनी दगडं मारली तर होणार्‍या नुकसानीपेक्षा तुम्ही काचेच्या घरातून दगडं मारताना सहजी दिसाल व पकडल्या जाल ही शक्यताच ज्यास्त महत्वाची आहे. जगातले सगळे नैतिक वागणे ह्याच भीतीपोटी, चांगले दिसण्याच्या निकडीपायी समाजाने विचारात घेतले आहे असे कोणाच्याही ध्यानात येईल. सीसीटीव्ही कॅमेरा चालू असो वा नसो, तो आहे एवढेच वास्तव आतंकवाद्याला अडचण निर्माण करणारे असते. असाच दिसल्या जाण्याचा धाक आपल्याला शाळेत वर्गात गडबड करताना, घरात वडिलांच्या उपस्थितीत, परिक्षेत सुपरवायझर देखरेख करताना, सिग्नल तोडताना आजूबाजूला पोलीस नाही ना ह्या खबरदारीमागे, सामाजिक समारंभात चांगले वागताना ( अगदी वैर्‍याशीही हस्तांदोलन करताना ), घरात पाहुणे आले असताना अस्ताव्यस्तता दिसू नये ह्या खबरदारीमागे असतो, हे सहजी आपल्या लक्षात येईल.
असाच एक कॅमेरा, जो सीसीटीव्ही च्या अगदी विरुद्ध आहे ( म्हणून समजा आपण त्याला व्हीटीसीसी म्हणूयात ! ) असा असतो व तो नियंत्रण करणारा वापरत असतो किंवा निदान तशी त्याची इच्छा असते. उदाहरण घ्या, सोनिया गांधींचे. सगळ्या जगाला माहीत आहे की खरी सत्ता ह्या बाईकडेच आहे. पण ती कायम लोकांच्या नजरेपासून दूर राहते. मी नाही, मनमोहन सिंग हे पंतप्रधान असल्याने, सर्वेसर्वा आहेत, असे ती चाणाक्षपणे आपल्याला भासवते. म्हणजे तिच्या ह्या व्हीटीसीसी कॅमेर्‍याने तिचे नियंत्रण आपल्याला दिसणार नाही अशी तिची इच्छा असते. ह्याच पडदा टाकण्याच्या वृत्तीपायी मग त्या आपले दुखणेही जनतेपासून लपवून ठेवतात. आणि हे लपवून ठेवणे किती कीव येण्याजोगे आहे ते पहा. आपण जर ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलात उपचाराला गेलो तर लोकांना नक्कीच कळते की आपल्याला काय झाले आहे, किंवा टाटा मेमोरियल मध्ये गेलात तर कॅंसर झालाय, हे सांगावेच लागत नाही. तसेच त्यांना न्यूयॉर्कच्या स्लोन-केटरिंग मेडिकल हॉस्पिटलात शस्त्रक्रियेला नेले म्हणजे काय झालेय हे ज्यांना स्लोन केटरिंग हे कॅंसरचे सर्वात प्रगत हॉस्पिटल आहे हे माहीत आहे त्यांना लगेच कळते. मग कितीही व्हीटीसीसी कॅमेरे लावून धूसरता पसरवली तरी जे कळायचे ते लोकांना कळतेच. पण ह्यातून सत्ता गाजवणार्‍यांना स्वत: पडद्याआड राहणे किती निकडीचे असते त्याची चुणूक पहायला मिळते.
अण्णा हजारेंना अटक करण्याचे हुकूम कोणी दिले हे जनतेला तेव्हाच कळते, जेव्हा होम मिनिस्टर म्हणतात की मला माहीत नाही, हे काम पोलीस कमिश्नरांचे आहे, त्यांना माहीत असेल. ह्या म्हणण्यामागे मलाही असा व्हीटीसीसी कॅमेरा, पडदा ठेवणारा कॅमेरा, हवाय असेच ते जणु मागत असतात. राज-सत्ता उपभोगणार्‍याला पडद्याची गरज अशी प्रचंड असते व ते ती अशी वेळोवेळी न दाखवणारे व्हीटीसीसी कॅमेरे उभारून दाखवत असतात.
सीसीटीव्ही कॅमेरा काय घडतेय ते टिपत असतो तर व्हीटीसीसी ऍंटी-कॅमेरा काय दिसतेय त्यावर पांघरूण घालीत असतो !

--------------------------------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

रविवार, २८ ऑगस्ट, २०११

स्टीव्ह जॉब्ज
वेस्ट इंडीजला असताना एक भारी विनोद प्रचारात होता. तो असा की "ऍडम ऍंड ईव्ह" ही जुन्या काळातली लैंगिकता झाली. आज पुढारलेल्या काळात ती आहे: "ऍडम ऍंड स्टीव्ह !" तर स्टीव्ह नावाचा परिचय मला असा झाला होता. हा स्टीव्ह जॉब्ज दुसरा !
सध्या अमेरिकेला जेव्हढी तूट आहे तेव्हढी रोख रक्कम ह्या स्टीव्ह जॉब्जच्या ऍपल कंपनीकडे शिल्लक आहे, ह्यावरूनच त्याच्या यशाचे मोजमाप कोणीही करावे. आणि हे सुद्धा ह्या पार्श्वभूमीवर की दहा वर्षांपूर्वी ह्याच कंपनीने ह्याला चक्क काढून टाकले होते. आणि हा एकेकाळी भारतीय मंदीरात फुकटचे मिळते म्हणून जेवण घेत असे. माणूस किती मोहक असावा ! एव्हढ्या यशाच्या शिखरावर असून स्वत: अगदी अलिप्त राहणारा. कॅंसरशी एकाकी झुंज देणारा. लीव्हर ट्रान्सप्लॅंट करून पॅंक्रीयसच्या कॅंसरशी टक्कर देणारा. कॅंसरच्या उपचारासाठी कंपनीतून दोनदा सहा सहा महिन्यांची रजा घेणारा. आणि तरीही त्या दरम्यान आय-फोर हा क्रांतीकारी फोन बाजारात आणणारा. आजही एक जीन व काळे टी शर्ट असा साधा पोषाख एक फॅशन म्हणून संगणक जगात रूढ करणारा. आई-बापांनी दत्तक घेतलेला एक मुलगा इतका प्रसिद्ध व्हावा ह्यात काहीतरी देवाचे संदेश आहेत असे वाटावे. ह्याची उत्पादने किती खपावीत ? अमेरिकेत सकाळीच लोक ह्याच्या दुकानांसमोर रांगा लावतात व नऊ दहा वाजेपर्यंत माल संपला म्हणून त्यांना सांगावे लागते. यश मिळावे तरी किती अजून, इतके हे प्रचंड यश आहे.
ह्याचे स्टॅन्फोर्ड मध्ये शिक्षण अर्धवट टाकून कंपनी सुरू करणे असेच मोहक आहे. आज अमेरिकेत ऍपल कंपनीचे संगणक तरुणात फारच लोकप्रिय आहेत इतके ते वापरायला सोपे आहेत. ह्याचा आवडता विषय होता : कॅलिग्राफी. म्हणजे सुलेखन किंवा आपले अच्युत पालव जे अक्षरांचे निरनिराळे प्रकार करतात त्याचे शास्त्र. ह्याचे सगळेच और आहे.
माझा मुलगा एका संगणक कंपनीत डायरेक्टर असून स्वत: प्रोग्रॅम करतो. त्याला मी एकदा सहज विचारले होते की स्टीव्ह जॉब्ज हा बिल गेटस्‌ पेक्षा ज्यास्त हुशार समजायचा का ? कारण आज इतकी वर्षे झाली बिल गेटस्‌ ची ऑपरेटींग सिस्टीम अजून रोज वाढत्या क्रमाने लोकप्रिय होतच आहे. संगणक क्षेत्रात कुठलीही बाब एक दोन वर्षापेक्षा मंजधारेत रहात नाही आणि ह्याची इतकी वर्षे टिकलीय म्हणजे हाच श्रेष्ठ विद्वत्तेचा असा माझा समज. तर त्याच्याशी तुलना करता आता स्टीव्हचाच पहिला नंबर आपण काढू. ह्यावर कंपन्यांचे काम करणे कसे असते हे जवळून पहात असलेला माझा मुलगा म्हणाला: आजकाल एका माणसाच्या विचाराने एखादे उत्पादन, कल्पनेपासून प्रत्यक्ष उत्पादन व ग्राहकाच्या हातात जाईपर्यंत प्रभावित होईल हे खूप अशक्य आहे. उत्पादने इतकी गुंतागुंतीची झालेली आहेत की त्यांना प्रत्यक्षात काम करायला हजारो हुशार माणसांचे योगदान लागते व ते ज्या कंपनीला जेव्हा जमते तेव्हाच त्यांना यश लाभते. म्हणजे ऍपलच्या यशात एकट्या स्टीव्ह जॉब्जचा वाटा किती व त्याच्या हुशार इंजिनियरांचा किती, कंपनीच्या एकूण कारभाराचा वाटा किती हे सखोल संशोधनाचेच काम आहे असे समजायचे.
जगात आत्तापर्यंत तीनच सफरचंदे प्रसिद्ध होती. एक ऍडमने ईव्हला दिलेले, दुसरे न्यूटनने पडताना पाहिलेले, व एक रोज खाल्ल्याने डॉक्टरांना दूर ठेवणारे. आता हे चौथे सफरचंद ( ऍपल ), स्टीव्ह जॉब्जचे, येणारी कित्येक वर्षे अधिराज्य गाजवणार आहे. त्याच्या सेवनाने त्याचा संस्थापक लवकरच बरा होवो !
स्टीव्ह जॉब्ज
वेस्ट इंडीजला असताना एक भारी विनोद प्रचारात होता. तो असा की "ऍडम ऍंड ईव्ह" ही जुन्या काळातली लैंगिकता झाली. आज पुढारलेल्या काळात ती आहे: "ऍडम ऍंड स्टीव्ह !" तर स्टीव्ह नावाचा परिचय मला असा झाला होता. हा स्टीव्ह जॉब्ज दुसरा !
सध्या अमेरिकेला जेव्हढी तूट आहे तेव्हढी रोख रक्कम ह्या स्टीव्ह जॉब्जच्या ऍपल कंपनीकडे शिल्लक आहे, ह्यावरूनच त्याच्या यशाचे मोजमाप कोणीही करावे. आणि हे सुद्धा ह्या पार्श्वभूमीवर की दहा वर्षांपूर्वी ह्याच कंपनीने ह्याला चक्क काढून टाकले होते. आणि हा एकेकाळी भारतीय मंदीरात फुकटचे मिळते म्हणून जेवण घेत असे. माणूस किती मोहक असावा ! एव्हढ्या यशाच्या शिखरावर असून स्वत: अगदी अलिप्त राहणारा. कॅंसरशी एकाकी झुंज देणारा. लीव्हर ट्रान्सप्लॅंट करून पॅंक्रीयसच्या कॅंसरशी टक्कर देणारा. कॅंसरच्या उपचारासाठी कंपनीतून दोनदा सहा सहा महिन्यांची रजा घेणारा. आणि तरीही त्या दरम्यान आय-फोर हा क्रांतीकारी फोन बाजारात आणणारा. आजही एक जीन व काळे टी शर्ट असा साधा पोषाख एक फॅशन म्हणून संगणक जगात रूढ करणारा. आई-बापांनी दत्तक घेतलेला एक मुलगा इतका प्रसिद्ध व्हावा ह्यात काहीतरी देवाचे संदेश आहेत असे वाटावे. ह्याची उत्पादने किती खपावीत ? अमेरिकेत सकाळीच लोक ह्याच्या दुकानांसमोर रांगा लावतात व नऊ दहा वाजेपर्यंत माल संपला म्हणून त्यांना सांगावे लागते. यश मिळावे तरी किती अजून, इतके हे प्रचंड यश आहे.
ह्याचे स्टॅन्फोर्ड मध्ये शिक्षण अर्धवट टाकून कंपनी सुरू करणे असेच मोहक आहे. आज अमेरिकेत ऍपल कंपनीचे संगणक तरुणात फारच लोकप्रिय आहेत इतके ते वापरायला सोपे आहेत. ह्याचा आवडता विषय होता : कॅलिग्राफी. म्हणजे सुलेखन किंवा आपले अच्युत पालव जे अक्षरांचे निरनिराळे प्रकार करतात त्याचे शास्त्र. ह्याचे सगळेच और आहे.
माझा मुलगा एका संगणक कंपनीत डायरेक्टर असून स्वत: प्रोग्रॅम करतो. त्याला मी एकदा सहज विचारले होते की स्टीव्ह जॉब्ज हा बिल गेटस्‌ पेक्षा ज्यास्त हुशार समजायचा का ? कारण आज इतकी वर्षे झाली बिल गेटस्‌ ची ऑपरेटींग सिस्टीम अजून रोज वाढत्या क्रमाने लोकप्रिय होतच आहे. संगणक क्षेत्रात कुठलीही बाब एक दोन वर्षापेक्षा मंजधारेत रहात नाही आणि ह्याची इतकी वर्षे टिकलीय म्हणजे हाच श्रेष्ठ विद्वत्तेचा असा माझा समज. तर त्याच्याशी तुलना करता आता स्टीव्हचाच पहिला नंबर आपण काढू. ह्यावर कंपन्यांचे काम करणे कसे असते हे जवळून पहात असलेला माझा मुलगा म्हणाला: आजकाल एका माणसाच्या विचाराने एखादे उत्पादन, कल्पनेपासून प्रत्यक्ष उत्पादन व ग्राहकाच्या हातात जाईपर्यंत प्रभावित होईल हे खूप अशक्य आहे. उत्पादने इतकी गुंतागुंतीची झालेली आहेत की त्यांना प्रत्यक्षात काम करायला हजारो हुशार माणसांचे योगदान लागते व ते ज्या कंपनीला जेव्हा जमते तेव्हाच त्यांना यश लाभते. म्हणजे ऍपलच्या यशात एकट्या स्टीव्ह जॉब्जचा वाटा किती व त्याच्या हुशार इंजिनियरांचा किती, कंपनीच्या एकूण कारभाराचा वाटा किती हे सखोल संशोधनाचेच काम आहे असे समजायचे.
जगात आत्तापर्यंत तीनच सफरचंदे प्रसिद्ध होती. एक ऍडमने ईव्हला दिलेले, दुसरे न्यूटनने पडताना पाहिलेले, व एक रोज खाल्ल्याने डॉक्टरांना दूर ठेवणारे. आता हे चौथे सफरचंद ( ऍपल ), स्टीव्ह जॉब्जचे, येणारी कित्येक वर्षे अधिराज्य गाजवणार आहे. त्याच्या सेवनाने त्याचा संस्थापक लवकरच बरा होवो !

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११

वाघाचे पंजे---१३
सोनियांचे धूमजाव !
मनमोहनसिंगांचे तिसरे बायपास ऑपरेशन भारतात, अटल बिहारी बाजपेयी उपचार घेताहेत भारतात, अशी कितीतरी उदाहरणे आपण पाहतो की उपचार कुठे घेणे सोयीस्कर पडते आजकाल त्याची . शिवाय काय आजार असेल त्याची इत्थंभूत माहीती लोकांना मिळतेच. आमचे एक शेजारी एका सरकारी दफ्तरात खूप मोठे अधिकारी होते. ते आमच्याच औषध दुकानातून औषध घेत. एकदा बोलता बोलता सहज दुकानदार बोलून गेला की, नाही-- त्यांना बराच त्रास आहे. मी विचारले कसचा ? तर म्हणाला डिप्रेशनचा. जो अजिबात काही शिकलेला नाही, त्या दुकानदारालाही औषधांवरून कळले की ह्यांना डिप्रेशन आहे. आता कोणी टाटा मेमोरियल ( कॅंन्सर हॉस्पिटल ) मध्ये उपचार घेत असेल तर साहजिकच ते कॅंन्सरवरचे असणार. आणि आजकाल असा कोणता आजार आहे की ज्याच्याबद्दल लाज वाटावी ? अगदी एड्स्‌ झाला तरी त्याचे कोणाला काही वाटू नये इतके सर्व आजार हे सन्मान्य झाले आहेत. तेव्हा पूर्वी जसे गुप्त-रोगाबद्दल गुप्तता बाळगीत तशी आजकाल कोणत्याच रोगाबद्दल गुप्तता बाळगण्याचे कारण राहिलेले नाही. शाहरुख खान एवढा प्रतिमेला जपणारा पण तो सारखा सिगरेटी ओढतो हे लहान मुलांनाही माहीत असते.
तर हे नमन कशाला ? तर सोनिया गांधींना खरेच काय झाले असावे ? स्लोन केटरिंग हे कॅंन्सरचेच हॉस्पिटल आहे. आणि असला समजा कॅंन्सर तर काय बिघडते ? आजकाल कॅंन्सरनेही काही कोणी लगेच मरत नाही. आठ-दहा वर्षात बरेही होतात. मग एवढी गुप्तता का पाळताहेत ? एक कारण असावे--मॅडम आजारी आहेत म्हटल्यावर मंडळी कोपर्‍यानेही खणायला लागतील त्याची ? हॅ ! अशा खाण्याबिण्याचे कोणाला काय पडलेय ?
किंवा असे तर नसेल ? आता सीएजीचा रिपोर्ट येणार आहे त्याची तारीख त्यांना नक्कीच माहीत असणार. तिहार मध्ये आता इतके राजकारणी जमा होताहेत की खरे पैसे कुठे पोचवलेत ते आता केव्हाही सांगतील. मग बाहेर जाणेही शक्य होणार नाही. इराणच्या शहाचे आठवतेय का ? त्याने व त्याच्या बायकोने कपडेलत्ते-जडजवाहीर-पैसे ह्याने भरलेले एक विमान कायम तयार ठेवलेले होते म्हणतात व त्यातूनच तो पळाला होता. सद्दाम हुस्सेन असाच एक बिलियन डॉलर घेऊन पोबारा करणार होता. पाकीस्तानचे मुशर्रफ असेच लंडनला दडून बसलेले आहेत. बेनझीरही आधी तिथेच होती. तेव्हा सत्ताधार्‍यांनी वाईट काळ आल्यावर पळून जाणे काही नवे नाही. त्याच्यासाठीच आजकाल कोणालाही पकडले तर आधी पासपोर्ट जप्त करतात. आयपीएल वाले मोदी नाही का पळून गेले म्हणूनच बचावले ? अशांची सोयही लागते तिकडे पटकन, पैसे असले की.
सगळे कुटुंब मिळून जाण्यासाठी आजार हा चांगला पटण्यासारखा बहाणा आहे. शिवाय तिथली सोय होण्यासाठी सगळे असेच तर करतात. ईजिप्तचे होस्नी मुबारक ह्यांना तर पलंगासकट तुरुंगात ठेवले असून कदाचित आजारपणामुळेच सोडतीलही. लंडनला एका राजकीय अपराध्याला सोडल्याच्या बर्‍याच कहाण्या आहेत.
जंगलात वाघांच्या पंजांच्या ठशावरून ते कोणत्या दिशेने गेले असतील, किती असतील, हे जाणकार जसे ओळखतात तसे हे वाघाचे पंजे काय दाखवतात बरे ?

-------------------------------------------------------------------------------------------------

बुधवार, २० जुलै, २०११

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वाघाचे पंजे-----१२
कटरीनाचा इंडियन कैफ
शितावरून भाताची परीक्षा किंवा जंगलात नुसत्या वाघाच्या पंजांच्या ठशावरून वाघाचा ठावठिकाणा शोधण्या सारखाच प्रकार आहे, लोकांच्या बेसावध बोलण्यावरून काही मूलभूत समजूती समजून घेण्याचा.
काय म्हणाली कटरिना ? तिचे वडील एशीयन होते, आई ब्रिटिश होती, आणि ती सध्या इंडियन सिनेमाची अनभिक्षित राणी आहे, म्हणून काय झाले, मी काही एकटीच अशी अर्धी इंडियन नाहीय, राहूल गांधीही असेच अर्धे इंडियन आहेत की ?
आता ह्यावरून राष्ट्रीयतेच्या कल्पना कशा रुजतात, कशा बदलतात हे पाहणे मोठे मजेशीर आहे. आजकाल भारतात प्रत्येक घरटी एक तरी जण अमेरिकेत असतो. आणि तो खूप वर्षांपासून तिथे असेल तर तो अमेरिकनच असतो. पण ते जेव्हा इथे येतात, किंवा तिथे असतानाही, त्यांना आपण व तिथले लोक भारतीयच समजतो. भले त्यांच्याकडे अमेरिकन नागरिकत्व असो, अमेरिकन पासपोर्ट असो. सुरुवातीला त्यांना ते अमेरिकन आहेत, असेच दाखवायचे असते. पण त्यांचे चेहरे, रंग-रूप हे असते भारतीय. तेव्हा त्यांना तिथले लोक भारतीयच समजतात, तसेच वागवतात. हळू हळू त्यांना तो समज पत्करावा लागतो. माझी नातवंडे अमेरिकन नागरिक आहेत. ती नुकतीच सुटीत भारतात आली होती. सुटीच्या रिवाजाप्रमाणे आमचे खूप सिनेमे पाहणे झाले. सिनेमे होते अमेरिकनच. जसे कुंफू पांडा-२, पायरेटस्‌ ऑफ कॅरीबीयन, हॅरी पॉटर वगैरे. आजकाल मल्टीप्लेक्स मध्ये सिनेमाच्या अगोदर राष्ट्रगीत होते. आणि एक राष्ट्रगीत तर मुक्या-बहिर्‍यांच्या भाषेतले एव्हढे अप्रतीम आहे की ते सगळ्यांच्याच मनाला शिवते. पाच सहा सिनेमात माझी नातवंडे जन-गण-मन सहज गुणगुणू लागली. ते त्यांना पाठ झाले व आवडलेही. मी त्यांना अमेरिकन ऍंथेम विषयी विचारले तर कां कू करीत सांगू लागली की आम्हाला ते येत नाही, कारण आमच्याकडे ते क्वचितच वाजवतात, म्हणतात. आता राष्ट्रगीत येण्यावरून काही नागरिकत्व ठरत नाही हे खरे, पण ह्या अमेरिकन नातवंडांना, एका सुटीत, हेच आपले राष्ट्रगीत वाटू लागले आहे. मग हे भारतीयच झाले की !
असेच "अर्धे इंडियन" ह्या समजूतीचे आहे. बाप किंवा आई ह्यापैकी एकच इंडियन असेल तर त्यांची मुले आपण म्हणतो अर्धी इंडियन आहेत. आता जीवशास्त्राप्रमाणे हे बरोबर का चूक माहीत नाही, पण साधारणपणे आपण असेच समजतो. कांटेकोरपणे पाहिले तर इंदिरा गांधींचे यजमान फिरोज गांधी हे मुसलमान होते, त्यांचे लग्नही इंग्लंडला त्याच पद्धतीने झाले होते. पण महात्मा गांधींच्या मध्यस्तीमुळे ते परत हिंदू पद्धतीने भारतात झाले. ह्या समजूतीने राजीव गांधी अर्धे मुसलमान, अर्धे हिंदू होतील. त्यामुळेच सोनियांच्या आईवडिलांचा सुरुवातीला विरोध झाला असावा. आता त्यांचा मुलगा राहूल, आई ख्रिश्चन व बाप अर्धा मुसलमान, ह्या हिशेबाने ठरेल पाव मुसलमान व अर्धा ख्रिश्चन !. ( म्हणूनच कदाचित तो उरलेली मुसलमानी पावली, शोधीत असावा ! ).
सौंदर्य जसे चित्रात नसून ते चित्र पाहणार्‍याच्या डोळ्यात असते, तसेच भारतीयत्व किंवा हिंदुत्व हे पाहणार्‍यांच्या समजूतीत असायला हवे ! चित्रा वरून एम.एफ.हुसेन ह्यांची आठवण निघायलाच हवी . कतार सरकार काही सवलती देते म्हणून ते भले कतारी झाले असतील, पण इतिहास व जनता त्यांना भारतीय चित्रकारच मानणार . हिंदूंच्या विरोधामुळे ते भारत सोडून गेलेले असले तरी लोक त्यांना भारतीयच समजणार. मग कागदोपत्री काही का असेना !
हेच तर आहे, म्हंजे, म्हंजे, वाघाचे पंजे !

-----------------------------------------------------------------------------------------------

बुधवार, १ जून, २०११

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वाघाचे पंजे----११
दादरची चैत्यभूमी , बारामतीची चरामती/करामती !
आता वेळ आलीच आहे तर दादर बरोबर सगळीच नावे बदलूयात :
-------------------------------------------
दादर ( जिथे सगळेच मध्ये मध्ये आहे ) : चैत्यभूमी , किंवा मराठीत आंबेडकर, थांबा ! ( रेल्वे प्रवाशांसाठी दिदींचा प्रस्ताव : C H A I T Y A B H O O M E E , ही एवढी अक्षरे एका तिकिटात न मावण्याने दादरच्या प्रवाशांना दोन तिकिटे घ्यावी लागतील ! )
------------------------------------------------
शिवाजी पार्क ( जिथे राज ठाकरे राहतात ): लुंपीनी पार्क किंवा चैत्यभूमी ( वेस्ट )
--------------------------------------------------------------------------
बांद्रा ( जिथे कोण राहतात ?) : दैत्यभूमी
----------------------------------------------------------
बारामती ( जिथे पूर्वीचे साक्यमुनी चराचरात चरतात ) : चरामती ( सत्तेवर असताना), करामती ( सत्तेवर नसताना )
-------------------------------------------------------------------------------------------------
लातूर ( जिथे अनेक पॅटर्न्स असतात ) : ( इटालियन थाटात ) la tour
---------------------------------------------------------------------------------------------------------------
नांदेड ( जिथे सगळेच "आदर्श" फिके पडतात ) : सव्वा-देड ! किंवा आम-बेड !
-------------------------------------------------------------------------------------
पुण्यातील सदाशिव पेठ ( जिथे "ब्राह्मण हिंदुत्वात विष कालवतात" असे नेमाडेंना दिसते ) : रमा पेठ ( आंबेडकरांच्या मुलाने जसा रमाबाईंवर विषप्रयोग केल्याचा आरोप केला होता, त्या विषप्रयोगाच्या स्मृतीत ! )
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दिल्ली ( जिथे भावी राजकुमार वाट पाहतात ) : राहूलचा हूल किंवा राहूल-चाहूल किंवा रा-हूलचा-हूल किंवा राहूल-नग-र
---------------------------------------------------------------------------------------------------------
कराड ( जिथे कुंपणच सर्वत्र मिरवते ) : यशोदरा-नगर किंवा यशोदा-नग-र किंवा येस-सर-नगर
---------------------------------------------------------------------------------------------------
मुंबई ( जिथे बुद्ध धर्माचा मूल मंत्र घुमतो ) : दु:खई , दु:ख-खाई, डुंबई ( पावसाळ्यात)--हुंबई ( उन्हाळ्यात )--शानगयी ( कायम )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
गांधीनगर ( जिथे मोदींना चांगले म्हणताच येत नाही ) : मोदी-बगैर-नगर किंवा दंगलाबाद किंवा दंगलानाबाद किंवा तीस्तासेटलमेंट
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
चेन्नई ( जिथे राज्य येते, जाते ) : चैन नई , किंवा चैन-नाही किंवा चेन नयी
-----------------------------------------------------------------------------------------------------------
बेंगळूरू ( जिथे राज्य जाता जाता राहते, राज्यपाल पालीसारखा चुकचुकतो ) : बेंग-सुरुळू , बिंग-सुरुळू , किंवा बिंग-गळू-सुरू
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
हैद्राबाद ( जिथे बाप जातो, मुलगाही जातो ) : हैक्याबापबाद किंवा कौन बापबाद किंवा है-बाप-बाद
-------------------------------------------------------------------------------------------------------------
आग्रा ( जिथे कधी माया कधी गया ) : वा आज ! वा माज !
-------------------------------------------------------------------------------------------------------
नवीन नावाप्रमाणेच प्रत्येकाला एक युनीक आयडेंटीटी नंबर ( आधार ) घेणे क्रमप्राप्त आहे . ओळखा पाहू हा कोणाचा नंबर : 4912


( क्ल्यू : 4912 आपण हाताने लिहितो तसे लिहा, वरच्यासारखे दिसेल : प वा र, ह्याचा आधार असा : एकूण नऊ खंडापैकी चार खंडात ( त्रिखंडापेक्षा ज्यास्त) ज्यांचे भूखंड ते बारा मतीवाले ! काका तसेच पुतणे ! )
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सोमवार, २ मे, २०११

वाघाचे पंजे----११
पासवर्डस्‌ : अरे ला का रे !, फिर मिलेंगे !
ओसामा बिन लादेनला ओबामाने कसे पकडले, मारले व समुद्रतळाशी कसे दफन केले हे वाचून भारतीय मंत्रीगण थरारून गेले. मॅडमचा निरोप आला की ह्या संबंधी एक तातडीची बैठक बोलावली आहे व त्यात युवराज काही महत्वाचे सांगणार आहेत, तेव्हा या बर, पटकन !
मॅडमची निळी साडी, सरदारांची मॅचिंग निळी पगडी, सिबलांच्या कपाळावर छोटी पटटी, पांढरे-फेक केसावर उठून दिसणारा सलमान खुर्शीदांचा काळा चष्मा, संरक्षण मंत्र्यांचा दाक्षिणात्य पोशाख, चिदंबरांचे शुभ्र मुंडु, आणि हे काय ह्या सभेत अण्णा हजारे कसे ? तेच युवराज सांगू लागले : आपणही अमेरिकेसारखे ऑपरेशन करायचे, चार हेलिकॉप्टर भरून कमांडो न्यायचे व कराचीहून दाऊदला मुसक्या बांधून घेऊन यायचे. बोला कोण नाही म्हणताहेत ? सगळे हो हो करायला लागले. सगळे अण्णांकडे पहात मनमोहनांना नजरेने विचारू लागले, हे कसे इथे ? ह्या ऑपरेशनमध्येही घोटाळा झाला की काय ?
मनमोहन म्हणू लागले, यह लंबी कहानी है. ( त्यांच्या कहाण्या सफळ व लंब्याच वाटतात ! ). प्रॉब्लेम असा आहे की आपले हेलिकॉप्टर्स सध्या जरा भरकटू लागले आहेत.त्यांना चांगल्या सपोर्टची गरज आहे. शिवाय ते पाकिस्तान्यांना रडारवर दिसले नाही पाहिजेत. त्यासाठी इस्त्रोच्या, देव्हास कंपनीचे जे ट्रान्स्पॉंडर्स बसवले आहेत, ते त्यांना काही काळ बंद ठेवावे लागतील. १९९५ मध्ये जसे पुरुलिया ड्रॉप मध्ये मिलिट्रीचा रडार जसा बंद ठेवला होता तसा. आता ही व्यवस्था बलवाच्या एका परदेशी कंपनीकडे आहे व त्यासाठी अण्णाजींना बोलावले आहे. अण्णा आणि बलवा, यह कैसा संबंध ? त्यावर मॅडमच म्हणाल्या, नही उनका तालुक बलवासे नही, लेकिन पवारजीसे, और पवारजी का गोयंकासे है, उसके लिये उन्हे बुलाया है. पण अण्णा तर पवारांच्या विरुद्ध . ते नाही म्हणाले तर ? तर आपण त्यांच्या भूषणावह पितापुत्रांना नाही म्हणू. बर, मग त्यांनी काय करायचे ? तर तिहारला जाऊन गोयंकाला निरोप द्यायचा की तुझ्या कंपनीला सांग रडार बंद ठेव आठ-एक तासासाठी. केव्हा व कसा रडार बंद ठेवायचा ते पवार सांगतील. पवार का ? तर दाऊद, त्याचा गुटख्याचा धंदा, ९३ चे स्फोट, पुणे, व त्या लाइनमधली जाणकारी वगैरेसाठी पवार. आता गांधीजींनी ह्याला मान्यता नसती दिली , पण व्यापक देशहिताचा विचार करता दुसर्‍या गांधींना हो म्हणायला हरकत नाही, शिवाय ह्याने भूषणांची सोय होते आहे असे समजून, अण्णा राजी झाले.
झाले ! सर्व निश्चित झाले ! ऍंटनीनी कमांडो वगैरेची व्यवस्था केली. सगळे आता श्वास रोखून ऑपरेशन कधी होते व आबा दाऊदला कधी ताब्यात घेतात त्याची वाट पाहू लागले. पश्चिम बंगालहून मॅडम व युवराज विचारणा करू लागले की काय झाले ? केव्हा ? अण्णा म्हणू लागले, मी बारामतीला विचारतो. इकडे पवारांना काहीच माहीती नाही. तेव्हढ्यात बारामतीचा ऑपरेटर लाईनवर आला व विचारू लागला की मिलिट्री प्रथेनुसार ते पासवर्ड विचारताहेत. काय सांगायचा पासवर्ड ? समोर अजीतदादांकडे पहात साहेब म्हणाले "पासवर्ड : अरे ला का रे "
ऑपरेशन सुरू झाले, फत्तेही झाले, दाऊद भेंडीबाजारात येऊनही पोचला, आबांकडे डिएनए रिपोर्टही आला, नेव्हीचे पाणबुडे समुद्रतळाकडे कसे जायचे त्याची आखणी करु लागले, तेव्हढ्यात दिग्विजय सिंगांचा तातडीचा निरोप आला की आत्ताच राष्ट्रपतींचा माफीनामा आलाय की सर्व मुसलमान कैद्यांना माफी देण्यात आली आहे, अफझल गुरू, दाऊद... वगैरे. तेव्हा आता इतमामाने दाऊदला परत पाठवायची व्यवस्था करा !
आणि टीव्ही वर ब्रेकिंग न्यूज येऊ लागली "यूपीए-३"चा प्रचंड विजय. ४०० सीटस, कॉंग्रेसला मिळाल्या आहेत. दाऊदला पकडले म्हणून हिंदुत्ववाद्यांनी प्रचंड मते दिली आणि त्याला सोडले म्हणून अल्पसंख्यांकांनी ! दाऊद्ला परत पाठविणारे हेलिकॉप्टर निरोपाची वाट पहात होते. वैमानिकाने विचारले काय पासवर्ड ? आता पासवर्ड होता : फिर मिलेंगे !

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मंगळवार, १९ एप्रिल, २०११

वाघाचे पंजे---१०
चोराच्या वाटा....
आपण आपल्या दुसरीतल्या मुलीला "मार्क कमी का मिळाले ?" म्हणून दटावले की हमखास उत्तर मिळते की "बाबा, जया तर नापासच झालीय." आता जयाच्या नापास होण्याने हिचे कमी असलेले मार्क का ज्यास्त होतात ? पण हे असेच चालते व आपण ह्याला कायम फशी पडतो. भ्रष्टाचाराचेही असेच आहे. शरद पवारांच्या मानाने, कपिल सिबल हे तर धुतल्या तांदळासारखेच आहेत. हे आपल्याला लगेच पटते. अण्णांनाही ते पटते. शांती भूषण हे स्वत: एकेकाळी कायदेमंत्री होते. त्या काळात त्यांनी लोकपाल-बिल का नाही आणले ? असे कोणी म्हटले की त्यांची १३६ कोटीची मिळकत आपल्याला संशयास्पद वाटायला लागते. मग त्यांच्या सिड्या बाहेर आल्या की भले भले म्हणू लागतात की जर पवारांना आपण नको म्हटले तर ह्यांनाही नकोच म्हणावे.
ह्या असल्या विचारात आपली गल्लत कुठे होते ? नीट कप्प्याकप्प्याने विचार न केल्याने. ही कमीटी कशाची आहे ? तर लोकपाल-बिलाचा मसुदा करायची. त्यात कोण हवे ? तर ज्यांना मसुदा करण्याची माहीती आहे, कायदा कसा व्यवस्थित करावा, त्यात पळवाटा कशा ठेऊ नयेत ही माहीती असणारे. अण्णांना तर ही काहीच माहीती नाही. मग ते कशाला हवेत ? तर राजकारणी लोक सोयीस्करपणे एकतर कायदा/ बिल आणण्याचे टाळतील व आणला तरी लुळा-पांगळा असा ठेवतील अशी भीती वाटते, व त्यांच्यावर वचक हवा म्हणून. आता असे बिल तयार करण्यासाठी भ्रष्टाचारी राजकारणी कसा कसा भ्रष्टाचार करतात हे माहीत असणारे लोक असावेत की ज्यांना भ्रष्टाचार म्हणजे कसे लिहायचे बुवा, असे सांब-सदाशिव नैतिक चारित्र्याचे लोक असावेत ?
पूर्वी म्हणायचेच ना, की चोराला पकडायचे असेल तर चोरालाच सांगा, कारण चोराच्या वाटा चोरांनाच माहीत असतात. ( टु कॅच ए थीफ, सेट ए थीफ ! ). पोलीस स्वत: शुद्ध चारित्र्याचा असून काय उपयोग, त्याला चोराला पकडता आले पाहिजे. आणि हे काही आजकालचे विचार नाहीत. थेट तुकाराम महाराजांपासून चालत आलेले आहेत. ते म्हणाले होते : अति जालें उत्तम वेश्येचें लावण्य । परि ते सवासीण न म्हणावी ॥ उचित अनुचित केले ठाया ठाव । गुणां मोल वाव थोरपण ॥ शूरत्वावांचूनि शूरांमाजी ठाव । नाहीं आयुर्भाव आणिलिया ॥ तुका म्हणे सोंग पोटाचे उपाय । कारण कमाईंविण नाहीं ॥.
असे जर आहे तर मग कायदा/बिलाचा मसुदा करण्यासाठी फक्त योग्यता व दृष्टिकोण पहावा. जर वकीलाने १३६ कोटीची माया चोरांना पकडून केलेली असेल, वा चोरांना पळून जायला मदत करून मिळविलेली असेल तरीही त्याला पळवाटा चांगल्याच माहीत आहेत असेच सिद्ध होते, व तो योग्यच ठरतो. चोर पकडायला चोर नेमावा ह्या न्यायाने खरे तर अमरसिंहानाच ह्या कमीटीवर नेमले तर चांगले. उगाच चारित्र्याचा निष्कलंक असण्याचा बाऊ करण्यात काय अर्थ ?
जंगलात वाघाला पकडायचे असेल तर तो पाणी प्यायला केव्हा येतो, हे त्याच्या पंजांच्या ठशांच्या खाणाखुणावरून शिकारी लोक ठरवतात. ते वाघाला पाणी पिताना त्याची शिकार कशी करायची असा अहिंसेचा विचार करीत नाहीत. एवढेच कशाला काही मचाणावरचे शिकारी तर खाली बकरीला वाघाच्या तोंडी देण्याची व्यवस्था करूनच सरसावून बसतात. वाघांच्या पंज्यांवरून सावज हेरायचे असेल तर अण्णांनीही अशी एखादी बकरी बांधून बघायला हरकत नाही. शिकार साधल्याशी मतलब, शेळी वातड आहे का मऊ ते वाघ बघेल....!

----------------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------------

रविवार, १० एप्रिल, २०११

जेपीएल चा वर्ल्ड-कप
अखेर जेपीएल चा वर्ल्ड-कप अण्णाज फास्ट-लोकपाल्स नी जिंकला ! अहो, जेपीएल म्हणजे जंतरमंतर-पाल-लीग ! फायनल होती मनमोहन्स अडियल्स विरुद्ध. तसे अण्णाज फास्ट लोकपाल्स हे अंडर-डॉग्जच होते. राळे-गण-सिद्धी हे कसे पाकीस्तानच्या रावळ-पिंडी सारखेच वाटते. पण तिथले अण्णा हे खरेच फास्ट बोलर आहेत. रावळपिंडी एक्सप्रेस पेक्षा त्यांचे फेकणे भारी असल्याने महाराष्ट्रातले लोक त्यांना राळेगण-एक्स्प्रेस असेच म्हणतात. त्यांनी आत्तापर्यंत इतकी फेकाफेक केलेली आहे व इतके फास्टस केलेले आहेत की "मॅक्डोनाल्ड" ह्या आंतर-राष्ट्रीय फास्टफुड चेनने त्यांना आपले ब्रॅंड-ऍंबॅसेडरच केले आहे. ( धिस इज रियली ए फास्ट वन ! आणि ह्यात एकप्रकारचा सूक्ष्म व मनमोहक अंतर्विरोध आहे तो असा, की उपवास करणारा हा फास्टफुडचा ब्रॅंड-ऍंबॅसेडर !).
मनमोहन्स अडियल्स ह्यांना जंतर-मंतर हा व्हेन्यूच पसंत नव्हता. त्यांचे म्हणणे तिथले पिच इतके अंडर-प्रिपेअर्ड आहे की तिथे काहीही फेकले तर ते खस्सकन उसळते ! आणि मग कपाळमोक्ष ! त्यापेक्षा लोकसभेचे पिच कसे गुळगुळीत ! ६२ वर्षे वापरून वापरून चिकने झालेले . तिथे डेडली बाऊन्सर्स टाकले तरी ते अंडर-आर्म टाकल्यासारखे चोपता येतात. पण अण्णाज फास्ट लोकपाल्सची तिकडे मेंबरशिप नाहीय, म्हणून त्यांना मज्जाव आहे. मग मॅच कशी होणार ? मग असे डील झाले की अण्णाज फास्ट लोकपाल्स जंतर-मंतरला खेळतील व रिव्हयू सिस्टिमने मग टू-जी-प्लेयर-सिबल, ह्यांच्या होमग्राऊंडवर, मनमोहन अडियल्स आपली ताकद दाखवतील.
पहिलाच चेंडू राळेगण-एक्सप्रेसचा, शरद पवारांवर उसळला . पवार जागच्या जागी उभे. थोडे पुढे झुकतात तोच केजरीवालने स्टंप्सच उडवले. झाले, अण्णाज नी अपील केले, स्टंप्ड ! सिबलच लेग अंपायर होते. त्यांचे म्हणणे पडले की पवारांनी अटेम्प्टच केला नाही, तर आऊट कसे काय ? शिवाय सरकार कोणाचेही असले तरी पवार नेहमीच इन असतात, आऊट कधीच होत नाहीत, असा नियमच आहे . फास्ट लोकपाल्स नी त्यांचा पहिला रिव्ह्यू वापरला. मोठ्ठया पडद्यावर स्लो-मोशन मध्ये रिव्हू सुरू झाला. अण्णांचा पाय रेषेच्या आतच होता, त्यामुळे तो नो-बॉल तर नव्हता. पण बॉलचा रोख होता लव्हासा, बलवाचे विमान, गोयंका ह्या तीन टारगेटसवर (स्टंप्स ) . बॉलचा रोख त्याच लाइनीत होता, जसे कोणावर हमखास व डायरेक्ट आरोप असावेत तसा. अंपायर सिबल, चिकी चघळत, मेन थर्ड अंपायरेस कडे आशाळभूतपणे बघत होते. अंपायरेस मॅडम दक्षिणेत निवडणुकीच्या दौर्‍यावर ! त्या तिथेच एक कटाक्ष टाकत विचार करू लागल्या, द्यावे का देऊ नये,... असे सारखे होत होते. पवारांना कधी नव्हे तो झटका आला व ते सरळ तंबूकडे चालू लागले ! पहिली विकेट तर पडली !
मॅडम दिल्लीत नाहीत, सिबल काहीतरी हायटेक ( टू-जी, थ्री-जी, जिजी र जिजी र जी जी ) बोलताहेत, पवार रुसलेत, आणि पब्लिक अण्णांना चियर करते आहे, ह्या सगळ्या गोंधळात मनमोहन्स अडियल्स तर्फे कोणाला पाठवावे ते ठरेना. सिबल म्हणू लागले मीच खेळतो व अंपायरही मीच ! मग मनमोहन म्हणू लागले, आपण मॅचच सोडू , मग अण्णाची सेंच्युरी तरी होणार नाही !. सिबल म्हणू लागले, पण तसे लिहून देऊ नका . केजरीवाल, अग्निवेश, भूषण, बेदी, म्हणू लागले की नाही, जेपीएलचा वर्ल्ड कप आम्हाला पाहिजे व त्यासाठी तुम्हाला तशी नोटिफिकेशन ( मॅच सोडल्याची ), द्यावीच लागेल. अमेरिकेशी अणू-करार-लीग खेळताना नाही का तुम्ही लेखी दिले, बिल पास करवून घेतलेत ? मनमोहनांनी थर्ड अंपायरेस ला परत दक्षिणेत कॉल दिला. त्यांना वाटले, आपण मॅच सोडली तर मॅडम खूपच चिडतील. तर झाले विपरीतच. इकडे मॅडम खूशच होत्या. त्यांना तिकडे दक्षिणेत, राजाची दक्षिणा मिळालेली होती. त्या म्हणाल्या... दक्षिणा सलामत तो मॅच पचास ! त्या म्हणाल्या,... द्या की लिहून. येतं ना, लिहिता... गुरुमुखीत ?
जेपीएलचा वर्ल्ड कप अशा रितीने अण्णांच्या फास्ट लोकपालसनी उचलला. त्याला ओठ लावलेले अनेक फोटो काढल्या गेले. पवार म्हणू लागले, हा काही खरा कपच नाहीय ! खरा कप लव्हासालाच आहे ! लगेच सर्वच वाहिन्यांवर हायलाईटस सुरू झाले. मॅच इतक्या लवकर संपली की कित्येकांना ती नीट पाहताच आली नव्हती. ते डोळ्यात तेल घालून पाहू लागले व त्यांना कळू लागले की आयला...ही पण फिक्स्ड !


-----------------------------------------------------------------------------------------

मंगळवार, २२ मार्च, २०११

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


वाघाचे पंजे---८
हसन-अली ह्या पुण्याच्या घोडेव्यापार्‍याला दोन वर्षांपूर्वी अटक करून त्याची जबानी चित्रित करणार्‍या एका पोलीस अधिकार्‍याला निलंबित करण्यात आले आहे. ज्या हसन अलीने ७०हजार कोटीचा नुसता कर बुडवला आहे व स्विस बॅंकेत ८ बिलियन डॉलर जमा केले आहेत, त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय कारवाई करीत आहे. ह्या हसन अलीला दोन वर्षापूर्वी अटक करून त्याची जबानी चित्रित करणार्‍या महाराष्ट्राच्या एका पोलीस अधिकार्‍याला नुकतेच निलंबित करण्यात आले आहे. त्याचे नाव आहे देशभ्रतार.
भ्रतार म्हणजे नवरा. देशभ्रतार म्हणजे देशच ज्यांचा नवरा आहे तो . म्हणजे देशाची बायकोच. तर बायको कशी बायको सारखी हवी. तिने खालच्या मानेने घरकाम, चूल-मूल पहावे. नेमलेला बंदोबस्त, मंत्र्यांच्या ताफ्याला सुरक्षा, येता जाता मुजरा, सांगितलेल्या पकड, चौकशी कर, असे नेहमीची कामे पहावीत . बाहेरच्या भानगडीत तिने कशाला पडावे. हसन-अली ह्याला केंद्र सरकारचे ई-डी खाते ७०हजार कोटीचा कर बुडवला म्हणून कारवाई करीत आहे. हिने त्यात कशाला पडावे ? बरे पडलेच तर राजरोस मुलाखतीची सीडी काढून त्याचा पुरावा कशाला ठेवावा ? बाई माणसाने स्वत:ची अक्कल कशाला चालवावी ? कोणत्या तीन मुख्यमंत्र्यांचे पैसे तो हवाला मार्गे गुंतवीत होता, हे काय पोलीसांचे काम आहे का ? त्यांनी कसे "बंदोबस्त" म्हटले की बंदोबस्त करावा. गृहमंत्री कोणाला व कशाला पोलीस कमिश्नर म्हणून नेमत आहेत हे त्याला पाहण्याची काय गरज होती ? आणि वर मागून मागून लाच मागितली ती सुद्धा किती ? तर फक्त एक कोटी ! अशाने आधीच पांडू हवालदाराचा एवढुसा असलेला , मान , कमी होतो ना ! बरे हसन अली किती लाख कोटींचा मालक आहे हे ह्याला माहीत असताना ह्याने फक्त एकच कोटी मागावे ? मराठी माणसाला कधी विशाल महत्वाकांक्षा येणार अशाने ?
हजार चोर दरवडेखोर सुटले तरी चालतील, पण महाराष्ट्र पोलीसांचा असा अपमान करणार्‍या देशभ्रताराला (देशाच्या बायकोला), चांगलेच वठणीवर आणले पाहिजे. महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीद-वाक्य निदान ह्याने तरी लक्षात ठेवायला हवे. "सत-रक्षणाय, खल-निग्रहणाय". म्हणजे सज्जनांचे रक्षण व खळांचे नियंत्रण करणारे हे पोलीस-दल आहे. तीन मुख्यमंत्री हे तर सज्जन आहेतच. ते आपले पैसे ज्याला इतक्या विश्वासाने गुंतवण्यासाठी देतात तो हसन अली ह्याला सज्जन वाटला नाही ? त्याला निलंबितच केले पाहिजे. अशा प्रामाणिक सती-सावित्रीचा आव आणणार्‍या अधिकार्‍यांना राजकारणी भ्रतारांचा इंगा दाखवलाच पाहिजे. अशा खळांना नियंत्रणात ठेवलेच पाहिजे. शिवाय एक कोटीच आणि तेही स्वत:साठीच मागतो काय ? घे आता मिळेल ते !
म्हणतात की जंगलचे राज्य असलेल्या ठिकाणी सुद्धा, जंगलात , वाघांच्या पंजांच्या ठशावरून त्याचा माग काढतात. वाघ किती आहेत, कुठे आहेत हे ताडतात. तसेच, सुशिक्षित समाजात ज्या घटना घडताहेत त्यावरून लोकांनी काळाची पाउले, ओळखायला हवीत व त्याप्रमाणे आपले विचार बदलायला हवेत ! म्हणजे, म्हणजे,...वाघाचे पंजे !


---------अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०११

वाघाचे पंजे-----७
शिवानंदांचे शिव शिव !
शिवानंदन ह्यांची ख्याती चांगलीच आहे. त्यामुळे ते परवा बोलले ते का व कशासाठी हा प्रश्न पडतोय का ? तर जंगलात आपण जसे आधी वाघाच्या पंजांचे ठसे तपासतो व मग कोणता वाघ कुठे असेल ते सांगतो, तसे काही "ठसे" पाहू.
सोनवणे ह्या अधिकार्‍याला तेल-माफियावाल्यांनी का जाळून मारले ते एव्हाना आपल्याला कळलेच आहे. तेल-माफिया अस्तित्वात आहे व चांगला रगड धडधाकट आहे, हे तर आपल्याला पटलेलेच असते. तशात सोनवणे हे काही फार धुतल्या तांदुळाच्या प्रतिमेचे होते ( अशी काही प्रतिमा असते ह्यावरच सध्या संशय वाटतो आहे ! ) अशातले नाही. तेव्हा ते वसूलीसाठी गेले असावेत हेही संभवनीय आहे. त्यातून हे जळित प्रकरण झाले असावे. असे आपल्याला वाटते ना वाटते तोच शिवानंदन ह्यांनी दुसरेच अस्त्र परजले आहे. ते म्हणतात मुळात ह्या तेल-वाळू-माफियांविरुद्ध तुम्ही कारवाई करू नका असा सरकारनेच पोलिसांना आदेश काढलेला आहे. म्हणजे हे कुरण कलेक्टर व महसूल अधिकार्‍यासाठी राखीव आहे, असाच त्याचा सरळ अर्थ निघतो. मग पोलीसांनी धाडी टाकल्या, काही लोकांना पकडले अशा बातम्या प्रसृत झाल्या त्या कशा ? तर शिवानंदन म्हणतात, अहो तो सगळा बनाव होता ! तुम्हा आम्हाला बनवण्यासाठी !
आता राजकारणी असे बनेल आहेत, हे तर आपल्याला माहीतच आहे. ते तर आपल्याला लगेच पटतेही. पण हे शिवानंदन साहेब, इतके बेधडक कसे बोलताहेत ? त्यांना भीती कशी नाही वाटत ?
तर ही बातमी बघा : आता २८ फेब्रुवारीला शिवानंदन साहेब निवृत्त होत आहेत !
चला निवृत्त होताना का होईना वाघाला तो वाघ होता हे कळले हेही नसे थोडके !

-----अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

शनिवार, ५ फेब्रुवारी, २०११

वाघाचे पंजे---६
ई-जप्त !
रस्ता कुठे जात नाही नि येत नाही, पण आपण म्हणतो हा राजरस्ता आहे. हा तुम्हाला राजाकडे घेऊन जाईल. राजा धूर्त असेल तर तो रस्त्यांच्या चौकींवर, वळणांवर नाकेबंदी करील व सर्वांना परतवून लावील व मग आपण जो राजरस्ता धरला होता तो आपल्याला परत आणून सोडेल. रस्त्यावर !
रस्ता कधी लाभतो तर कधी लाभतही नाही. महात्मा गांधींनी "चले जाव" म्हणून आपल्याला रस्त्यावरच खेचले होते व त्याला इंग्रजही घाबरलेच होते. मुंबईत एक फाटका माणूस, जॉर्ज फर्नांडिस, हवे तेव्हा लोकांना रस्त्यावर आणी , बंद पुकारी व हवे ते पदरात पाडून घेई. ज्या रस्त्याने त्याला हे मिळवून दिले त्यानेच मग कंटाळून त्याच रस्त्यावरून त्याला पिटाळलेही. इतके की आजकाल कोणीही मोर्चे काढतच नाही. रस्ता अडवून पाहणारे शेतकरी तर आजकाल रस्त्यावर न येता, शेतातच एंड्रीन पिऊन....
आता ईजिप्तचे रस्ते हे अनुभवू लागले आहेत.
एक बाई व्हीडीओ पाठवते लोकांना की आता खूप झाले मी चाललेय तहरीर चौकात, मुबारक गेले पाहिजेत म्हणायला, तुम्ही पण या आणि मग १५ दिवस लाखो माणसं तिथे जातात, मुबारक म्हणतात बर, बर आता मी राज्य सोडतो. तर हे ईजिप्त प्रकरण तसे खूपच पेटले म्हणायचे ! पण थांबा ! अमेरिकेला मिलिटरीला काहीतरी विकायचे असेल, तेल घ्यायचे असेल, जगाला त्याचे काही नसेल व पाहता पाहता मिलिटरीतला दुसरा कोणी येईल व ईजिप्तचे रस्ते परत पिरॅमिडसारखे ममीज मिरवायला लागतील.....
भाजपला वाटते समजा असेच आपण रस्ता-भरून माणसे रस्त्यावर आणली तर सोनियांना पायउतार करू शकू ? पण रस्त्याचे मानसशास्त्र मोठे अजब असते. नुकतेच त्यांनी काश्मीरात तिरंगा मोर्चा काढला होता. रस्ता बर्‍यापैकी भरलेला होता. पण काय झाले ? भारतातला रस्ता आता थकला आहे. गुज्जर लोकांनी कित्येक वेळा रस्ते अडवून भरवून झाले, पण आरक्षण काही त्यांना मिळत नाहीय. कारण रस्ता आता थकला आहे. इराणमध्ये हे लोकांनी कित्येक महिने करून पाहिले . शेवटी तिथले रस्तेही थकले.
रस्त्यावरचा माणूस हुशार ( स्ट्रीट स्मार्ट ) होतोच. रस्ताच त्याला स्मार्ट करतो. मुंबईत रोजच लाखो माणसं इकडचे तिकडे जातात. त्यांनी ठरवून ते केले तर कोणाच्या लक्षातही येणार नाही. स्मार्ट माणूस न जाऊनच ( बंद ) काय पाहिजे ते मिळवेल. त्याला माहीत आहे की समजा तो म्हणाला की सोनियाला घालवा, तर त्या जाऊन दुसरे कोणी तरी येईल, आपण मात्र आहोत तिथेच रस्त्यावर राहू. ह्या भरवशावरच तो आता कोणत्याही रस्त्यावर उतरत नाहीय. रस्ता थकलाय, रस्त्यावरचा माणूसही थकलाय !
रस्ता "प्रकरण" लवकरच जप्त होईल, तेव्हाच तो खरा ई-जप्त होईल ! ई-जप्त तुम आगे बढो, हम तुम्हारे ....


-----अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

सोमवार, ३ जानेवारी, २०११

वाघाचे पंजे---५
"धूम-२.....टू इटाली..."
इंदिरा गांधींच्या हातून जेव्हा सत्ता गेली तेव्हा सोनिया गांधी मुलाबाळासकट व राजीव गांधीसोबत दिल्लीतल्या इटालियन दूतावासात आश्रयाला गेल्या होत्या. एवढेच नव्हे तर ते सगळे तिथे तीन चार दिवस मुक्कामाला होते. उघडच त्यांना इटालीला जाणे ज्यास्त सुरक्षित वाटले असेल तेव्हा. म्हणतात की तेव्हा राजीव गांधी ह्यासाठी तयार नव्हते पण त्यांचा पहिल्यांदा तरी नाईलाज झाला होता.
आता ह्या बोफोर्सच्या लाचेवर टॅक्स आकारण्याच्या निकालाने त्यांच्यावर परत अशी पाळी येईल का ? त्या परत केव्हा पळून जाण्याचा विचार करतील ?
ह्या निकालाने लाच दिल्या गेली होती हे कळाले तरी ती कोणाला दिली गेली होती त्यात त्यांचे नाव येत नाही. किंवा राजीव गांधींचेही नाव येत नाही. त्यामुळे कायद्याने उद्याच अटक होईल अशी काही परिस्थिती नाही. पण हळू हळू पकड ढीली पडतेय हे मात्र दिसते आहे.
आंध्रातला जगन खरे तर एवढासा पोर. पण त्यानेही विरुद्ध जाऊन काहूर पेटविले. पोस्टर्स जाळली, निषेध केला. म्हणजे आंध्रातली सत्ता गेल्यातच जमा आहे. आता ती सांभाळायची म्हणजे बराच पैसा ओतावा लागणार. त्यापेक्षा तो खर्चच न करता परस्पर....
तरी बरे की राजा व राडिया ला अजून पकडलेले नाही. त्यांनी जर सुब्रह्मण्यम स्वामी सारखे सांगायला सुरुवात केली तर मोठी पंचाईत यायची. पाठींबा काढू नये म्हणून करुणाच भाकावी लागेल. त्यासाठी त्यांना शक्य तो मोकळेच ठेवावे लागेल. कलमाडींनीही चुपच बसावे तर त्यांनाही वेळ द्यावा लागेल. म्हणजे एकूण अजून खूप वेळ काढायचा आहे. नंतर अंगलट आले तर बघू.....
पहिल्याच जेपीसीचे भूत बोफोर्समधून प्रकट होतेय, तर दुसरी जेपीसी मंजूर केली तर निकालच लागला म्हणायचा. बरे इमानदारीने कोणावर भिस्त ठेवावी अशी माणसेही आजकाल भोवती नाहीत. प्रणबदांना मधनं मधनं राजीवजींच्या वेळेस मिळालेला प्रसाद आठवतो की काय कोण जाणे, कारण तेही आजकाल थोडे आशाळभूत झाल्यासारखे दिसताहेत. बिहार गेले, अजून काय काय जातेय कोण जाणे....तोपर्यंत थांबावे की ?.....बेनजीर, मुशर्रफ सारखी आधीच व्यवस्था करून ठेवावी ? धूम-२.....टू इटाली....करावे ?